Microsoft Global Outage : जगभरात मायक्रोसॉफ्टचं सर्व्हर ठप्प, ‘या’ क्षेत्राला बसला मोठा फटका

| Updated on: Jul 19, 2024 | 3:14 PM

मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरच्या बिघाडामुळे जगभरातील विमानसेवेवर मोठा परिणाम झाला. जगभरातील मोठी विमानतळं या बिघाडानं ठप्प पडली आहेत. यासोबत बँकसेवांवर देखील परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, झालेला हा तांत्रिक बिघाड हा २०२४ मधील सर्वात मोठं आयटी संकट असल्याचे सांगितले जात आहे.

आज शुक्रवारी अचानक मायक्रोसॉफ्टचं सर्व्हर डाऊन झाल्याचे पाहायला मिळाले. मायक्रोसॉफ्टचा वापर करणाऱ्यांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला. मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरच्या बिघाडामुळे जगभरातील विमानसेवेवर मोठा परिणाम झाला. जगभरातील मोठी विमानतळं या बिघाडानं ठप्प पडली आहेत. यासोबत बँकसेवांवर देखील परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, झालेला हा तांत्रिक बिघाड हा २०२४ मधील सर्वात मोठं आयटी संकट असल्याचे सांगितले जात आहे. इतकंच नाही तर मायक्रोसॉफ्टमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडाचा मोठा फटका लंडनच्या शेअर मार्केटला बसला आहे. दुपारी १२ ते १२.३० दरम्यान मायक्रोसॉफ्टचा सर्व्हर ठप्प झाला. कोणतंच काम होत नसल्याचे युजर्सना लक्षात आले. अचानक काही डिव्हाईस बंद झाले. यानंतर आता कंपनीने याबद्दल एक मेसेज युजर्सच्या स्क्रीनवर पाठवला. “तुमच्या डिव्हाईसमध्ये काहीतरी तांत्रिक बिघाड झाल्याने तो रिस्टार्ट करण्याची गरज आहे. आम्ही हा तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्याचा प्रयत्नात आहोत. तो दुरुस्त झाल्यानंतर तुमचा डिव्हाईस रिस्टार्ट करता येईल”

Published on: Jul 19, 2024 03:14 PM
Ladki Bahin Yojana : छ. संभाजीनगरात लाडक्या बहिणी त्रस्त, अर्ज भरण्यासाठी आलेल्या महिलांचा खोळंबा, कारण काय?
शिवप्रेमींसाठी आनंदाची बातमी, शिवकालीन वाघनखं साताऱ्यात; बघा पहिली-वहिली झलक