Uddhav Thackeray : ‘अपात्रतेचा निकाल आला तर राज्यात मध्यावधी’- उद्धव ठाकरे

| Updated on: Feb 24, 2023 | 12:44 AM

राज्यात मध्यावधी निवडणुका लागू शकतात असं मोठं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. काय म्हणाले ते पाहा...

मुंबई : उद्धव ठाकरे यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. त्यांनी यावेळी म्हटलं की, राज्यात मध्यावधी निवडणुका लागू शकतात. सुप्रीम कोर्टात जर अपात्रतेचा निकाल लागला तर राज्यात निवडणुका लागतील असं त्यांनी म्हटलंय.

‘मी प्रत्यक्ष व्यासपीठावर उपस्थित नाहीये. बऱ्याच दिवसांनंतर मी या माध्यमातून आपल्याशी संवाद साधतोय. जेव्हा आपलं सरकार होतं तेव्हा याच माध्यमातून आपण महाराष्ट्र सांभाळलं. तेव्हाची परिस्थिती वेगळी होती. अजित पवार उपमुख्यमंत्री होते. जयंतराव माझे मंत्रिमंडळातील सहकारी होते. आता सगळ्यांचा कठीण काळात साथ देणाऱ्या सहकाऱ्यांनो असा उल्लेख करतोय.’

‘वाटलं नव्हतं आशा पध्दतीने पोटनिवडणूक लढवावी लागेल. विरोधकावर मात करणं ही जिद्द बाळगावी लागते. पण आपला विरोधक निघून जावा आणि पोटनिवडणूक लागावी असं कोणालाच वाटत नाही. लक्ष्मण आणि मुक्ता टिळक यांना श्रद्धांजली वाहतो. आजची पोटनिवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती. त्या मताचा आदर करतो. पण लोकशाही मधला मोकळेपणा आता जिवंत आहे का.’

‘ज्यांना असं वाटत की ही निवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती. कारण आम्ही त्यांच्या घरातला उमेदवार दिला. अशा पद्धतीने सहनभूतीचे राजकारण तिकडून होत असेल तर लोकमान्य यांच्या घरात उमेदवारी न देता दुसऱ्याला दिली तेव्हा सहानुभूती कुठे गेली. तिथे तर टिळकांचे घराणे वापरून सोडून दिलं. ‘

Published on: Feb 24, 2023 12:41 AM
Udayanraje Bhosale | उदयनराजे भोसले जेव्हा कार्यकर्त्यांसाठी खास गाणं गातात..
Ajit Pawar On Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर अजित पवार यांचा टोला