Bhagat Singh Koshyari | मिलिंद नार्वेकरांकडून राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना वाढदिवसाच्या शुभेच्छा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबत राज्याचे मुख्य सचिव सिताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव आशिष सिंग आणि शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर देखील राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजभवनवर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी पोहचलेत. राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार असा दिड वर्ष संघर्ष असला तरी महाराष्ट्राची राजकिय संस्कृतीचा वारसा जपत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना शुभेच्छा देण्यासाठी आले असल्याची माहीती राजभवनवरील सूत्रांनी दिलीय. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबत राज्याचे मुख्य सचिव सिताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव आशिष सिंग आणि शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर देखील उपस्थित आहेत.’