VIDEO : Tejas Thackeray | एक घाव दोन तुकडे, तेजस उद्धव ठाकरे, नार्वेकरांच्या ट्विटची राजकीय वर्तुळात चर्चा
टीव्ही 9 मराठीशी बोलताना मिलिंद नार्वेकर म्हणाले, “मी फक्त शुभेच्छा दिल्या आहेत. तो माझा अधिकार नाही. त्यांचं कुटुंब आणि त्यांचा तो अधिकार आहे. विव्ह रिचर्ड्स यांच्या स्वभावावरुन तेजस यांना मी तसं म्हटलं आहे.
सामनातील जाहिरात आणि ट्विटबाबत टीव्ही 9 मराठीशी बोलताना मिलिंद नार्वेकर म्हणाले, “मी फक्त शुभेच्छा दिल्या आहेत. तो माझा अधिकार नाही. त्यांचं कुटुंब आणि त्यांचा तो अधिकार आहे. विव्ह रिचर्ड्स यांच्या स्वभावावरुन तेजस यांना मी तसं म्हटलं आहे. त्याचा राजकारणाशी संबंध नाही. कुटुंबातील एखादा व्यक्ती असा स्फोटक असावा. आदित्य, उद्धव ठाकरे हे संयमी आहेत. कुटुंबातील एखादा स्फोटक असावाच लागतो” शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव तेजस ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्तानं तेजस यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरु आहे.