Special Report | अपघातात शहीद झालेले ‘द ग्रेट वॉरियर’
या अपघातात देशाने आपला सीडीएस तर गमावला आहेच, पण देशाने आणखी 11 लोक या गमावले आहेत. बिपीन रावत, त्यांच्या पत्नी मधुलिका रावत आणि त्यांच्यासह आणखी 11 लोकांचा या अपघातात मृत्यू झाला आहे.
तामिळनाडू : कालचा दिवस देशासाठी आणि भारतीय सैन्यसाठी काळा दिवस ठरला आहे. कारण काल तामिळनाडूत झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात सीडीएस बिपीन रावत यांचाच मृत्यू झालाय. फक्त बिपीन रावतच नाही तर सेनेतील इतर काही उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनाही या अपघातात देशाने गावमलं आहे. बिपीन रावत ज्या व्याख्यानासाठी गेले होते, त्या व्याखानाला त्यांच्या पत्नी मधुलिका रावत याही गेल्या होत्या. त्याही बिपीन रावत यांच्यासोबत याच हेलिकॉप्टरने प्रवास करत होत्या. या भीषण हेलिकॉप्टर अपघातात बिपीन रावत यांच्या पत्नी मधुलिका रावत यांचाही मृत्यू झाला आहे. मधुलिका रावत या आर्मी वेल्फेअर फाऊंडेशनशीह जोडल्या गेल्या होत्या. त्यामुळे त्या अनेक कार्यक्रमात सीडीएस बिपीन रावत यांच्याबरोबर दिसून येत असत. या अपघातात देशाने आपला सीडीएस तर गमावला आहेच, पण देशाने आणखी 11 लोक या गमावले आहेत. बिपीन रावत, त्यांच्या पत्नी मधुलिका रावत आणि त्यांच्यासह आणखी 11 लोकांचा या अपघातात मृत्यू झाला आहे.