निलेश राणे शेंबडा, पोलिसांनी त्याच्या कानाखाली…; इम्तियाज जलील नेमकं काय म्हणाले?
मंगळवारी सांगलीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या शिवशक्ती-भिमशक्ती जनआक्रोश मोर्चाच्या व्यासपीठावरुन भाजप नेते आमदार नितेश राणे यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले. या वक्तव्यानंतर एकच वाद सुरू झालाय. यावर जलील यांनी पलटवार केला आहे.
निलेश राणे हा शेंबडा मुलगा आहे, त्याला इतके महत्व देऊ नका. महाराष्ट्रात भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आल्यानंतर समाज विभागला जाताना दिसतोय. अशातच नितेश राणेंसारखे असे काही वक्तव्य करतात. सकाळी उठल्यापासून आम्ही हिंदू आम्ही हिंदू म्हणतात. तुम्हीच आहात बाकी कोणी नाही का? असा सवाल एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांनी केला. पुढे ते असेही म्हणाले की, त्या ठिकाणी कोणी चांगलं पोलीस अधिकारी असता तर त्याच पोलिसांनी त्यांच्या थोबाडीत मारली पाहिजे होती, असं वक्तव्य एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांनी केले आहे. भाजप नेते नितेश राणे यांनी मंगळवारी सांगलीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या शिवशक्ती-भिमशक्ती जनआक्रोश मोर्चाच्या व्यासपीठावरुन एक वादग्रस्त वक्तव्य केले. राज्यात हिंदुत्ववादी सरकार आहे. त्यामुळे हिंदू मुलींच्या डोळ्यात अश्रू येऊ देऊ नका, असं नारायण राणे म्हणाले. हिंदू मुलींच्या डोळ्यात अश्रू आले तर अशा जिल्ह्यात बदली करू, बायकोचाही फोन लागणार नाही, असे नितेश राणे म्हणाले होते, त्यावर जलील यांनी पलटवार केला आहे.