Ladki Bahin Yojana : ‘लाडक्या बहिणी’ला फुकट पैसे का देताय? मुख्यमंत्र्यांवरच भडकला MIM चा नेता
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या या योजनेवरून एमआयएमचा नेता इम्तियाज जलील यांनी सरकारवरच निशाणा साधला आहे. लाडक्या बहिणीला तुम्ही फुकटचे दीड हजार रूपये देणार आहात, ते का देताय? बघा काय म्हणाले?
महायुती सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली आहे. या योजनेला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. या योजनेचा लाभ घेतल्यानंतर महिलांना आर्थिक पाठबळ मिळणार आहे. मात्र राज्य सरकारच्या या योजनेवरून एमआयएमचा नेता इम्तियाज जलील यांनी सरकारवरच निशाणा साधला आहे. लाडक्या बहिणीला तुम्ही फुकटचे दीड हजार रूपये देणार आहात, ते का देताय? असा सवाल करत इम्तियाज जलील म्हणाले, तुम्हाला राज्यातील महिला काही लाडक्या नाहीत तर तुम्ही भ्रष्टाचाराचे पैसे राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेंतर्गत लाभार्थी असणाऱ्या महिलांना देत आहात, असे म्हणत इम्तियाज जलील यांनी महायुतीवर हल्लाबोल केला. इतकंच नाहीतर लाडकी बहीण योजनेंतर्गत मिळणारे १५०० रूपये तुम्ही तुमच्या खिशात ठेवा आणि दोन महिन्यांनी होणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्हाला जास्तीत जास्त मतं द्या.. अशी राज्य सरकारची योजना आहे, असे म्हणत इम्तियाज जलील यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरून सरकार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली आहे.