इम्तियाज जलील यांची तिरंगा संविधान रॅली; रामगिरी महाराजांसह नितेश राणेंबाबत केली ‘ही’ मोठी मागणी

| Updated on: Sep 23, 2024 | 1:08 PM

माजी खासदार, एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांच्याकडून छत्रपती संभाजीनगर ते मुंबईपर्यंत आज तिरंगा संविधान रॅली काढण्यात आली आहे. या रॅलीत हजारो मुस्लिम बांधव सहभागी झालेत. पण तिरंगा संविधान रॅली काढण्याचे नेमके कारण काय?

छत्रपती संभाजीनगर ते मुंबईपर्यंत आज तिरंगा संविधान रॅली काढण्यात आली आहे. आज तिरंगा संविधान रॅली माजी खासदार, एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी आणि त्यांच्या समर्थकांकडून काढण्यात आली आहे. रामगिरी महाराज यांनी मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल एक वक्तव्य केलं होतं. या विरोधात जलील यांच्याकडून ही तिरंगा संविधान रॅली काढण्यात आली आहे. या रॅलीत हजारो मुस्लिम बांधव सहभागी झाले असून महंत रामगिरी महाराज आणि भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे. इतकंच नाहीतर ही तिरंगा संविधान रॅली मुंबईत दाखल झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना संविधान देण्यात येणार आहे. या रॅलीत जलील यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले, आजची ही तिरंगा रॅली आमची एमआयएम म्हणून निघालेली नाही तर आम्ही सर्व मुस्लिम बांधवांनी मिळून काढलेली आहे. आम्ही कोणत्याही जाती धर्माच्या विरोधात निघालेलो नाही तर हे कायद्याचं राज्य आहे. रामगिरी आणि नितेश राणे यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे, असं जलील म्हणाले.

Published on: Sep 23, 2024 01:07 PM
‘एकनाथ खडसे बदनाम गल्लीमधील…’, कोणी केली जिव्हारी लागणारी टीका?
‘राजकारणात काहीही होऊ शकतं…’, रविकांत तुपकरांनी नेमकं काय केलं सूचक वक्तव्य?