…तर आम्ही देखील शांत बसणार नाही, इम्तियाज जलील यांचा इशारा
केंद्रीय मंत्र्यांची जर ही अवस्था असेल तर खासदारांचं काय होईल”; खासदारांच्या बैठकीतील चर्चेवर इम्तियाज जलिल टीका
केंद्र सरकार 1 फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर करणार आहे, या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीत एमआयएमचे खासदरा इम्तियाज जलील हे देखील हजर होते. यावेळी त्यांनी राज्यातील अनेक विषय मुद्दे संसदेत मांडण्यात यावे, अशी चर्चा केली.
महाराष्ट्रातील 8 मंत्री केंद्रात आहेत तर या 8 मंत्र्यांनी जर एकत्र येऊन कोणतेही विषय लावून धरले तर नक्कीच त्याचा फायदा होईल अशादेखील सूचना या बैठकीत करण्यात आल्या आहेत. मात्र या बैठकीत केंद्रात मंत्री असणारे नेतेच आपलं रडगाणे गात होते. त्यामुळे आमच्यासारख्या खासदारांनी मग काय करायचे असा सवालच जलील यांनी उपस्थित केले.
तर मुंबईतील हिंदू जन आक्रोश संदर्भात त्यांना विचारणा करण्यात आली असता ते म्हणाले, महाराष्ट्रात अशांतता निर्माण करण्याचा हा डाव आहे आणि हे सरकारने ओळखलं पाहिजे. तेलंगणाचा नेता महाराष्ट्रात येऊन भडकाऊ भाषण करत असेल आणि महाराष्ट्रात अशांतता निर्माण करत असेल तर यावर राज्य सरकारने विचार करायला हवा. मुस्लिम धर्माला लक्ष्य करून जर आमच्याविषयी घाणेरड्या भाषेत राजकारण करत असतील तर आम्ही देखील शांत बसणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.