Imtiyaz Jaleel यांचं खळबळजनक वक्तव्य
शिवसेनेच्या महसूल मंत्र्यांनी एमआयएमच्या खासदाराला निवडून दिल्याचं हे वक्तव्य समोर आल्यामुळे सध्या चर्चेला उधाण आले आहे. मात्र लोकसभा निवडणुकीच्या वेळी अब्दुल सत्तार हे काँग्रेस सोबत होते.
औरंगाबाद : अब्दुल सत्तार यांच्यामुळेच मी लोकसभेत निवडून आलो आहे, अशा स्वरूपाचं खळबळजनक विधान एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केलं आहे. औरंगाबाद जिल्ह्यातल्या वैजापूर तालुक्यातल्या खंडाळा गावातील विकासकामांच्या उद्घाटन कार्यक्रमात इम्तियाज जलील बोलत होते. यावेळी मंचावर अब्दुल सत्तार हेही उपस्थित होते. शिवसेनेच्या महसूल मंत्र्यांनी एमआयएमच्या खासदाराला निवडून दिल्याचं हे वक्तव्य समोर आल्यामुळे सध्या चर्चेला उधाण आले आहे. मात्र लोकसभा निवडणुकीच्या वेळी अब्दुल सत्तार हे काँग्रेस सोबत होते.