अमित शाह मुंबईत, मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्री आले पण अजित पवार गैरहजर, कारण काय?

| Updated on: Sep 24, 2023 | 8:28 AM

tv9 Special Report | अमित शाह मुंबईत आले. त्यांच्यासोबत मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस होते मात्र अजित पवार काही शाहांसोबत दिसले नाही. त्यामुळं राजकीय वर्तुळात हाच चर्चेला विषय ठरलाय.

Follow us on

मुंबई, २४ सप्टेंबर २०२३ | केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे चाणक्य अमित शाह मुंबईत आले होते. त्यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीसही होते. पण दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर राहिले. हीच गैरहजेरी सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरलीय. अमित शाहांच्या स्वागतासाठी विमानतळावर मुख्यमंत्री शिंदे पोहोचले. शाहांसोबत देवेंद्र फडणवीसही होते पण दादा नव्हते. मुंबईत दाखल होताच अमित शाह वांद्र्यातील आशिष शेलारांच्या मंडळाच्या बाप्पाच्या दर्शनासाठी आले. त्यानंतर शाह लालबागच्या चरणी लीन झाले. इथंही अमित शाहांसोबत मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीसही होते. लालबागच्या राजाचं दर्शन घेऊन अमित शाह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वर्षा बंगल्यावर आले. इथंही त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या बाप्पाचं दर्शन घेतलं. इथंही त्यांच्यासोबत फडणवीस होते. वर्षावरुन अमित शाह उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या सागर बंगल्यावर आले.

सागर बंगल्यावरही बाप्पाचं दर्शन घेतलं. सागर बंगल्यावर मुख्यमंत्री शिंदेही आले. इथं अमित शाह, शिंदे आणि फडणवीसांमध्ये मंत्रिमंडळ विस्तार आणि आगामी लोकसभा निवडणुकीवर 25 ते 30 मिनिटं चर्चाही झाली. काय झाली चर्चा बघा स्पेशल रिपोर्ट