तुम्ही हजामत करू नका, मराठ्यांना भादरू द्या आपापसात…; भुजबळांनी नाभिक समाजाला नेमकं काय केलं आवाहन?

| Updated on: Feb 04, 2024 | 11:12 AM

एक कथित घटनेचा दाखला देत छगन भुजबळ यांनी संपूर्ण नाभिक आणि मराठा समाजाला या वादात खेचलं. जर दोन्ही समाज आपापले हक्क मागत असतील तर त्यात संपूर्ण समाजा कसा येतो? असा प्रश्न विचारला जातोय. . तर यापूर्वी सुद्धा ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनीही असंच विधान केलं होतं आणि आता तसंच मंत्री छगन भुजबळांचं विधान चर्चेत आहे.

Follow us on

मुंबई, ४ फेब्रुवारी २०२४ : आरक्षणाच्या वादात मंत्री छगन भुजबळ यांचा विरोध सरकारला आहे की संपूर्ण समाजाला? असा प्रश्न सध्या चर्चेत आहे. एक कथित घटनेचा दाखला देत छगन भुजबळ यांनी संपूर्ण नाभिक आणि मराठा समाजाला या वादात खेचलं. जर दोन्ही समाज आपापले हक्क मागत असतील तर त्यात संपूर्ण समाजा कसा येतो? असा प्रश्न विचारला जातोय. तर यापूर्वी सुद्धा ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनीही असंच विधान केलं होतं आणि आता तसंच मंत्री छगन भुजबळ यांचं विधान चर्चेत आहे. ओबीसी एल्गार सभेतून मंत्री छगन भुजबळ यांनी नाभिक समाजाला एक आवाहन केलं. यावरून पुन्हा वाद उफाळून येण्याची शक्यता आहे. ‘नाव्ही समजाला मी विनंती करतो की, सगळ्या मराठ्या समाजाची हजामत करू नका’, नेमकं काय म्हणाले छगन भुजबळ बघा स्पेशल रिपोर्ट?