हे मारूतीचं शेपूट… जरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या नव्या दिशेवरून छगन भुजबळांचा हल्लाबोल

| Updated on: Feb 22, 2024 | 5:24 PM

मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यावर बोलताना छगन भुजबळ म्हणाले मनोज जरांगे म्हणजे मारूतीचं न संपणारं शेपूट आहे, तर त्यांना प्रसिद्धीची नशा चढली आहे असे म्हणत भुजबळांनी जरांगेंना खोचक टोला लगावला आहे. पुढे भुजबळ असेही म्हणाले की, मनोज जरांगे पाटील याला कायद्याचं नियमाचं काहीच कळत नाही

मुंबई, २२ फेब्रुवारी २०२४ : मंत्री छगन भुजबळ यांनी पुन्हा मनोज जरांगे पाटील यांच्यावर सडकून टीका केली आहे. अजय महाराज बारसकर यांची क्लिप आपण पाहीली होती. त्यावरुनच आपण विधानसभेत भाषण केले होते असे सांगत मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यावर बोलताना छगन भुजबळ म्हणाले मनोज जरांगे म्हणजे मारूतीचं न संपणारं शेपूट आहे, तर त्यांना प्रसिद्धीची नशा चढली आहे असे म्हणत भुजबळांनी जरांगेंना खोचक टोला लगावला आहे. पुढे भुजबळ असेही म्हणाले की, मनोज जरांगे पाटील याला कायद्याचं नियमाचं काहीच कळत नाही. आता सगळे रस्ते, गाव बंद करण्याची घोषणा केली. लोकसभा निवडणूक आहे…त्यानिमित्ताने लोकं फिरणार मिटींग करणार त्यांना रोखणार…तर उपोषणाला वयस्कर लोकांना बसवणार…हा मुर्खपणा असल्याचे म्हणत भुजबळांनी जरांगेंवर हल्लाबोल केला आहे. तर  वयस्कर लोकांना उपोषणाला बसवताय आणि त्यांना काही झाले तर जबाबदार कोण? असाही सवाल भुजबळ यांनी केला आहे. जर वयस्कर लोकांच्या जीवाला काही झाले तर पोलिसांनी जरांगे यांना कारणीभूत ठरवावे अशी मागणी भुजबळ यांनी केली आहे.

Published on: Feb 22, 2024 05:24 PM
‘ते’ गंभीर आरोप, जरांगे पाटलांचा पलटवार; मुख्यमंत्री शिंदे यांच्या जवळच्या नेत्याचं घेतलं नाव
फक्त शरद पवारांचे जरांगेंना फोन, सगळ्या आंदोलनाचा खर्चही त्यांनी केला; बारसकरांनंतर एका महिलेचा घणाघात