मराठा आरक्षणावरून सरकारमध्ये भूमिकांचा पेच फसला? कुणाची भूमिका नेमकी काय?
मराठ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्यावरून मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्याच सरकारचे दंड थोपटले. त्यावरून भाजप आणि अजित पवार गटाची भूमिका सावध दिसतेय. मराठा आरक्षणावरून सरकारमध्ये भूमिकांचा पेच फसला की काय अशी शंका दिसतेय. सत्तेतील मंत्री भुजबळ यांनी कुणबी प्रमाणपत्र देण्यावरून विरोध केलाय.
मुंबई, ८ नोव्हेंबर २०२३ | मराठ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्यावरून मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्याच सरकारचे दंड थोपटले. त्यावरून भाजप आणि अजित पवार गटाची भूमिका सावध दिसतेय. यावरून भुजबळ यांची वक्तव्य काहिशी चुकीची असल्याची भूमिका शिंदे गटानं घेतली. मराठा आरक्षणावरून सरकारमध्ये भूमिकांचा पेच फसला की काय अशी शंका दिसतेय. सत्तेतील मंत्री भुजबळ यांनी कुणबी प्रमाणपत्र देण्यावरून विरोध केलाय. कोणतीही भूमिका न घेता मराठा आरक्षणाचा निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेणार असे अजित गटाचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटलंय. भुजबळांचे गैरसमज दूर करू असे शिंदे गटाचे मंत्री केसरकर म्हणाले. तर ओबीसी समाजाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण देणार असल्याचे बावनकुळे म्हणालेत. बघा मराठा आरक्षणावरून कोण कुणाकडे अन् कुणाची भूमिका नेमकी काय? बघा स्पेशल रिपोर्ट
Published on: Nov 08, 2023 11:23 AM