दिलबर के लिये दिलदार, दुश्मन के लिये… छगन भुजबळ यांचा शायरीतून जरांगे पाटलांवर हल्लाबोल

| Updated on: Feb 04, 2024 | 10:48 AM

मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसींची एल्गार सभा घेतली आणि या सभेतून मनोज जरांगे पाटील यांच्यावर मंत्री छगन भुजबळ यांनी हल्लाबोल केला तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही निशाणा साधला. २७ तारखेला गुलाल उधळलला मग पुन्हा कसलं उपोषण? तुम्ही म्हणाले आम्हाला आरक्षण मिळालं...असं म्हणत पुन्हा डिवचलं

मुंबई, ४ फेब्रुवारी २०२४ : सगेसोयरेच्या अधिसूचनेविरोधात मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसींची एल्गार सभा घेतली आणि या सभेतून मनोज जरांगे पाटील यांच्यावर मंत्री छगन भुजबळ यांनी हल्लाबोल केला तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही निशाणा साधला. ‘२७ तारखेला गुलाल उधळलला मग पुन्हा कसलं उपोषण? तुम्ही म्हणाले आम्हाला आरक्षण मिळालं…एक कागद हातात घेत म्हणाले मराठा आरक्षणासंदर्भातील अध्यादेश आला. लेकाला अध्यादेश म्हणजे काय कळत नाही…आणि नोटीफिकेशन्सचा मसुदा म्हणजे काय कळत नाही’, असे म्हणत मंत्री छगन भुजबळ यांनी जरांगे पाटील यांनी डिवचले. तर यावर मनोज जरांगे पाटील यांनी भुजबळांचा एकेरी उल्लेख करत जोरदार प्रत्युत्तर दिलंय. बघा नेमंक काय म्हणाले छगन भुजबळ यांच्या वक्तव्यावर मनोज जरांगे पाटील?

Published on: Feb 04, 2024 10:48 AM
लाथ मारण्याची गरज नाही… भुजबळांनी शिंदेंच्या आमदारांना ठणकावून सांगत काय केला मोठा गौप्यस्फोट?
तुम्ही हजामत करू नका, मराठ्यांना भादरू द्या आपापसात…; भुजबळांनी नाभिक समाजाला नेमकं काय केलं आवाहन?