अंजली दमानिया यांचा छगन भुजबळ यांना इशारा, कोणत्या प्रकरणावरून सुरूये वाक् युद्ध?

| Updated on: Nov 20, 2023 | 11:03 AM

मंत्री छगन भुजबळ आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यात वाक् युद्ध रंगलंय. सुपारीबाजांवर काय बोलणार अशी प्रतिक्रिया भुजबळ यांनी दिल्यावर यापुढे पुन्हा असे शब्द वापरल्यास तुमची खैर नाही, असा इशाराच अंजली दमानिया यांनी दिलाय.

मुंबई, २० नोव्हेंबर २०२३ : बंगला लाटण्याच्या आरोपांवर मंत्री छगन भुजबळ आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यात वाक् युद्ध रंगलंय. सुपारीबाजांवर काय बोलणार अशी प्रतिक्रिया भुजबळ यांनी दिल्यावर यापुढे पुन्हा असे शब्द वापरल्यास तुमची खैर नाही, असा इशाराच अंजली दमानिया यांनी दिलाय. जालन्याच्या अंबडमध्ये सभा घेतल्यानंतर अंजली दमानिया भुजबळांविरोधात आक्रमक झाल्यात. मुंबईतील सांताक्रुझमध्ये भुजबळांचं घर आहे. मात्र ते घर भुजबळ यांनी फर्नांडिस कुटुंबीयांकडून लाटल्याचा आरोप दमानिया यांनी त्या कुटुंबाला घेऊन केलाय. भुजबळ म्हणाले, सुपारी घेऊन सुपारी वाजवणारे लोकं असतात, समाजामध्ये त्यांच्यावर जास्त बोलणं योग्य नाही. यावर अंजली दमानिया म्हणाल्या छगन भुजबळ तुम्ही तोंड सांभाळून बोला नाहीतर तुमची खैर नाही, असा इशारा दिला. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट

Published on: Nov 20, 2023 11:03 AM
World Cup 2023 Final : ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीपुढे भारतीय फलंदाजांची शरणागती, भारताकडून ‘इतक्या’ धावांचं आव्हान
मंत्री सत्तार यांच्या घरी शहनाई, धाकट्या मुलाचं लग्न, पण चर्चा मात्र अपुऱ्या पोलीसबळाची