छगन भुजबळ यांचा नांदेडमध्ये अडवला ताफा अन्…, ओबीसी मेळाव्यापूर्वीच तणावाचं वातावरण

| Updated on: Nov 26, 2023 | 12:08 PM

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते मंत्री छगन भुजबळ आज हिंगोलीच्या दौऱ्यावर आहे. या ओबीसी एल्गार मेळाव्याला भुजबळ हजेरी लावणार. या एल्गार महामेळाव्यापूर्वीच नांदेडमध्ये भुजबळ यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न

हिंगोली, २६ नोव्हेंबर २०२३ : हिंगोली येथील रामलीला मैदानावर आज ओबीसीचा दुसरा एल्गार महामेळावा पार पडणार आहे, मेळाव्याची तयारी पूर्ण झालेली आहे. या मेळाव्याला ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्यासह आदींची उपस्थित राहणार आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलिसांनी या ठिकाणी तगडा बंदोबस्त देखील आहे. यानिमित्ताने राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते मंत्री छगन भुजबळ आज हिंगोलीच्या दौऱ्यावर आहे. या ओबीसी एल्गार मेळाव्याला भुजबळ हजेरी लावणार आहेत. छगन भुजबळ यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नांदेड विमानतळावर पोलिसांचा चोख बंदोबस्तही आहे. मात्र या एल्गार महामेळाव्यापूर्वीच नांदेडमध्ये भुजबळ यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. याप्रकरणी काहींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. दरम्यान, स्वराज्य संघटनेने सभा उधळून लावण्याच्या इशारा दिला होता. या इशाऱ्यानंतर पोलीस अलर्ट असताना ताफा अडवल्याचा हा प्रकार घडलाय.

Published on: Nov 26, 2023 12:06 PM
भाजप खासदारावर अज्ञातांनी भिरकावला दगड, खांद्याला झाली दुखापत
लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावर अजित पवार यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, क्षमता असणाऱ्या….