उद्धव ठाकरे यांच्या ‘त्या’ खोचक टीकेवर छगन भुजबळ यांचं प्रत्युत्तर, ‘अरे आनंद आहे, पेढाच काय..’

| Updated on: Dec 13, 2023 | 3:31 PM

छगन भुजबळ यांच्याकडे पेढे खायला जाणार आहोत. त्यांच्यावरील चौकशी अचानक बंद करण्यात आली. उद्धव ठाकरे यांनी असे वक्तव्य करत छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला तर उद्धव ठाकरे घरी आले तर पेढा काय संपूर्ण जेवण त्यांना देऊ, काय हरकत आहे. असा टोला भुजबळांनी लगावला

मुंबई, १३ डिसेंबर २०२३ : ईडीने मंत्री छगन भुजबळ यांच्यावरील कारवाई मागे घेतली आणि त्यांना मोठा दिलासा दिला यावरून उद्धव ठाकरे यांनी छगन भुजबळ यांना खोपरखळी लगावल्याचे पाहायला मिळाले. छगन भुजबळ यांच्याकडे पेढे खायला जाणार आहोत. त्यांच्यावरील चौकशी अचानक बंद करण्यात आली. त्यांना काही दिवस तुरूंगात ठेवल्यानंतर तुम्ही जामिनावर आहात, अशी जी दमदाटी सुरू होती मात्र आता भुजबळ यांनी कोणता चमत्कार केला हे जाणून घेण्यासाठी त्याच्या घरी पेढा खायला जाणार असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले तर यावर प्रत्युत्तर देताना भुजबळ म्हणाले, अरे आनंद आहे, उद्धव ठाकरे घरी आले तर पेढा काय संपूर्ण जेवण त्यांना देऊ, काय हरकत आहे. त्यासाठी ईडीची केस सुटली पाहिजे असं थोडी आहे ते कधीही येऊ शकतात असे म्हणत भुजबळांनी खोचक टोलाही लगावला.

Published on: Dec 13, 2023 03:31 PM
कारशेडमधून निघालेली ट्रेन प्लाटफॉर्मवर अन् एकच गोंधळ उडाला, बदलापूर रेल्वे स्थानकात नेमकं काय घडलं?
ऐसा कोई साथी हो…देवेंद्र फडणवीस यांनी गायलं गाणं, कुणाचा होता वाढदिवस? व्हिडीओ व्हायरल