Nawab Malik यांना अटक मोठी दुर्दैवाची गोष्ट – मंत्री Chhagan Bhujbal – tv9
नवाब मलिक यांना अटक झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक पार पडली. या बैठकीला राष्ट्रवादीचे वरिष्ठ मंत्री उपस्थित होते. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण देखील उपस्थित होते. यानंतर राष्ट्रवादीचे मंत्री आणि काँग्रेसचे मंत्री यांची शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित बैठक घेतली.
मुंबई : नवाब मलिक यांना अटक झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक पार पडली. या बैठकीला राष्ट्रवादीचे वरिष्ठ मंत्री उपस्थित होते. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण देखील उपस्थित होते. यानंतर राष्ट्रवादीचे मंत्री आणि काँग्रेसचे मंत्री यांची शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित बैठक घेतली. या बैठकीला शिवसेना मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित होते. या बैठकीनंतर महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेचा संदर्भ देत नवाब मलिक यांचा राजीनामा घेण्यात येणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.