छगन भुजबळांचं चाललंय तरी काय? सत्तेत असूनही महायुतीविरोधात भूमिका, नेमकं काय म्हणताय?
जितेंद्र आव्हाड यांनी महाडमध्ये मनुस्मृती दहन केले. त्यानंतर राज्यभरात भाजपने आक्रमक होत जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात आंदोलन सुरु केले आहे. असे असतानाही अजित पवार गटातील बडा नेता छगन भुजबळ यांच्याकडून जितेंद्र आव्हाडांची पाठराखण करण्यात आल्याचे पाहायला मिळाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महाडमध्ये मनुस्मृती दहन केले. त्यानंतर राज्यभरात भाजपने आक्रमक होत जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात आंदोलन सुरु केले आहे. असे असतानाही अजित पवार गटातील बडा नेता छगन भुजबळ यांच्याकडून जितेंद्र आव्हाडांची पाठराखण करण्यात आल्याचे पाहायला मिळाले. यावरून छगन भुजबळ यांचं नेमकं चाललंय तरी काय? असा सवाल सध्या उपस्थित केला जात आहे. गेल्या काही दिवसांत सातत्याने छगन भुजबळ यांनी महायुती विरोधात भूमिका घेतल्याचे पाहायला मिळाले. सुरूवातीला नाशिक लोकसभेच्या जागेसाठी भुजबळ इच्छुक असताना भाजपने हिरवा कंदील दिला पण तिकीट मिळत नसल्याने त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली. तर नाशिक लोकसभा निवडणुकीतून माघार घ्यावी लागल्यानतंर भुजबळ शिंदे गट आणि भाजपवर नाराज असल्याची चर्चा रंगू लागली होती. दरम्यान, यानंतर भुजबळांनी असं काय काय वक्तव्य केलं की ज्यामुळे सत्तेत असून त्यांनी विरोध केल्यानं त्यांच्या भूमिकेवर शंका उपस्थित केली जात आहे. बघा व्हिडीओ…