‘मी सर्व अंगावर परफ्यूम-सेंट मारून जातो, उलट्या कशा होतील’, भुजबळांचा कुणाला खोचक टोला?

| Updated on: Sep 06, 2024 | 5:31 PM

शिवसेना नेते आणि राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी केलेल्या वक्तव्यामुळे महायुतीत ठिणगी पडली. मंत्रिमंडळ बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांसोबत बसल्यानंतर बाहेर आल्यावर आम्हाला उलट्या होतात, असं वक्तव्य तानाजी सावंत यांनी भर सभेत केलं होतं. यावरून भुजबळांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे

उलट्या कशा होतील, मी तर परफ्यूम मारून जातो, असं वक्तव्य करत मंत्री छगन भुजबळ यांनी मंत्री तानाजी सावंत यांना खोचक टोला लगावला आहे. तर उलट्या होऊ नये म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तानाजी सावंत यांना गोळी दिली असेल, खोचकपण छगन भुजबळ म्हणाले. “काँग्रेस, राष्ट्रवादीचं आणि माझं कधी जमलेलं नाही. हे वास्तव आहे. कारण ते विचार परिपूर्ण अंगात भिनलेले आहेत. त्यामुळे ते शक्य आहे. आज जरी आम्ही कॅबिनेटला मागे राहून बसलो असलो तरी बाहेर जावून आम्हाला उलट्या होतात. सहन होत नाही.”, असं वक्तव्य तानाजी सावंत यांनी केलं होतं. यावर मंत्री छगन भुजबळ यांनी पलटावार केलाय. ‘ कशी काय उलटी होईल, मी तर सर्व अंगावर परफ्यूम मारून, सेंट मारून जातो. एकदम. कशा उलट्या होईल. होत असतील तर गोळीही असते. पूर्वी लहानपणी एसटी स्टँडवर गोळी खाल्ली तर उलटी होणार नाही. मला नाही वाटत असं असेल. मुख्यमंत्र्यांनी तानाजी सावंताना गोळी दिली असेल, असे खोचकपणे छगन भुजबळ म्हणाले.

Published on: Sep 06, 2024 05:31 PM
रोज भूमिका बदलण्यापेक्षा हिंमत असेल तर…, मंत्री छगन भुजबळ यांचं मनोज जरांगेना ओपन चॅलेंज
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्य दाखविण्यासाठी 21 भाज्यांची खरेदी