देवही आता मनोज जरांगे पाटील यांना घाबरतात, छगन भुजबळ यांचा टोला काय?

| Updated on: Dec 22, 2023 | 3:21 PM

मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार टोलेबाजी केली. कायद्या कायद्याच्या ठिकाणी...आपण करून टाकायचे कायदा वैगरे या भ्रामक कल्पना आहेत. जरांगे पाटील यांच्या अभिनव कल्पनांचा पाठपुरावा करायला पाहिजे, असे भुजबळ यांनी म्हटले असून जरांगे पाटील यांना खोचक टोला

मुंबई, २२ डिसेंबर २०२३ : सरकारच्या शिष्टमंडळाने काल मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली. मात्र ही चर्चा निष्फळ ठरली. यावरूनच मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार टोलेबाजी केली. कायद्या कायद्याच्या ठिकाणी…आपण करून टाकायचे कायदा वैगरे या भ्रामक कल्पना आहेत. जरांगे पाटील यांच्या अभिनव कल्पनांचा पाठपुरावा करायला पाहिजे, असे भुजबळ यांनी म्हटले असून जरांगे पाटील यांना खोचक टोला लगावला. तर देव जरी आडवा आला तरी मराठा आरक्षण घेणारच, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हणत आपल्या मागण्यांवर ठाम असल्याचे म्हटले आहे. त्यावर भुजबळ म्हणाले की, मनोज जरांगे पाटील देवालाही घाबरत नाहीत. त्यामुळे त्यांच्यासमोर सरकार काय करणार? तसेच मी याआधी केलेली माझी सर्व भाषणे मागे घेतो. तर पुढच्या मेळाव्यात जरांगे पाटील यांच्या बाजूने भाषणे करणार आणि त्यांना पाठिंबा देणार असल्याचे म्हणत छगन भुजबळांनी उपरोधिक टोलाही लगावला.

Published on: Dec 22, 2023 03:21 PM
छगन भुजबळ हतबल? मनोज जरांगे यांच्याबद्दल प्रश्न विचारताच स्वतःच म्हणाले, बिल्कुल…
‘सेना-भाजप एकत्र सत्ता स्थापन करणार हे संजय राऊतांनी लिक केलं’