Chhagan Bhujbal Uncut Speech : छगन भुजबळ यांची जरांगे पाटील यांच्यावर जोरदार टोलेबाजी, काय केली टीका?

| Updated on: Dec 22, 2023 | 7:37 PM

सरकारच्या शिष्टमंडळाने काल मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली. मात्र ही चर्चा निष्फळ ठरली. यावरूनच मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार टोलेबाजी केली. जरांगेनी सरकारला वेठीस धरलेले नाही तर सरकारनेच जरांगेना वेठीस धरले आहे.

Follow us on

मुंबई, २२ डिसेंबर २०२३ : मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे पाटील यांनी दिलेल्या अल्टिमेटमला काहीच तास शिल्लक आहेत. त्याआधीच सरकारच्या शिष्टमंडळाने जरांगे पाटील यांची भेट घेतली आणि यावेळी वेळ वाढवून मागितली. मात्र सगेसोयरे या शब्दावरून चर्चा फिस्कटली. कुणबी नोंदीवरून सगे सोयरे यांनाही जात प्रमाणपत्र द्या, अशी मागणी जरांगेंनी सरकारकडे केली. तर सरकारच्या शिष्टमंडळाने काल मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली. मात्र ही चर्चा निष्फळ ठरली. यावरूनच मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार टोलेबाजी केली. जरांगेनी सरकारला वेठीस धरलेले नाही तर सरकारनेच जरांगेना वेठीस धरले आहे. तसेच मी याआधी केलेली माझी सर्व भाषणे मागे घेतो. तर पुढच्या मेळाव्यात जरांगे पाटील यांच्या बाजूने भाषणे करणार असल्याचे म्हणत भुजबळांनी उपरोधिक टोलाही लगावला.  देव जरी आडवा आला तरी मराठा आरक्षण घेणारच, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हणत आपल्या मागण्यांवर ठाम असल्याचे म्हटले आहे. त्यावर भुजबळ म्हणाले की, मनोज जरांगे पाटील देवालाही घाबरत नाहीत. त्यामुळे त्यांच्यासमोर सरकार काय करणार? असा सवालही त्यांनी केला.