शिंदेंनी मंत्री केलं,1 रूपयाही घेतला नाही; पण पूर्वीच्या नेत्यांनी… केसरकरांचा ‘त्या’ गौप्यस्फोटाचा पुन्नरूच्चार
मंत्रिपदासाठी ठाकरेंनी पैसे मागितले की पक्षनिधीसाठी हे मला माहिती नाही’, असा मोठा गौप्यस्फोट मंत्री दीपक केरसकर यांनी काल केल्यानंतर त्यांनी आज पुन्हा याच गौप्यस्फोटावर भाष्य केले आहे. 'मी १ कोटी पक्षाला दिले पण आमच्याकडे पैसे नव्हते म्हणून मंत्रीपद दिलं नाही, मला याचं कधी वाईट वाटलं नाही.'
मुंबई, ८ फेब्रुवारी २०२४ : उद्धव ठाकरे यांच्याकडे मी १ कोटी रूपयांचा चेक दिला होता. मंत्रिपदासाठी त्यांनी पैसे मागितले की पक्षनिधीसाठी हे मला माहिती नाही’, असा मोठा गौप्यस्फोट मंत्री दीपक केरसकर यांनी काल केल्यानंतर त्यांनी आज पुन्हा याच गौप्यस्फोटावर भाष्य केले आहे. दीपक केसरकर म्हणाले, मी १ कोटी पक्षाला दिले पण आमच्याकडे पैसे नव्हते म्हणून मंत्रीपद दिलं नाही, मला याचं कधी वाईट वाटलं नाही. अशी तडजोड करून मंत्रिपद घेणं हा उद्देश नाही. मंत्रिपद हे सर्वसामान्य लोकांसाठी असतं. जे लोकं खोके खोके ओरडताय पण शिंदे यांनी कधीच पैसे मागितले नाही. मात्र पूर्वीच्या मंत्र्यांनी पैसे मागितले होते, ही वस्तूस्थिती आहे. यांनी विरोधी चित्र तयार केले आहे, त्या गौप्यस्फोटासंदर्भात मंत्री दीपक केसरकर यांनी पुन्हा पुन्नरूच्चार केला
Published on: Feb 08, 2024 04:48 PM