नारायण राणे यांच्यासमोर दुसरा उमेदवार टिकू शकणार नाही, कुणाचा मोठा दावा?

| Updated on: Feb 01, 2024 | 6:25 PM

केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांना पुन्हा राज्यसभेची उमेदवारी पुन्हा मिळणार नाही, असा दावा विरोधकांकडून सातत्याने केला जात आहे. विरोधकांच्या या टीकेवर मंत्री आणि शिवसेनेचे नेते दीपक केसरकर यांनी भाष्य केले आहे.

सिंधुदुर्ग, १ फेब्रुवारी २०२४ : केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांना पुन्हा राज्यसभेची उमेदवारी पुन्हा मिळणार नाही, असा दावा विरोधकांकडून सातत्याने केला जात आहे. विरोधकांच्या या टीकेवर मंत्री आणि शिवसेनेचे नेते दीपक केसरकर यांनी भाष्य केले आहे. राज्यसभेच्या खासदारांना लोकसभेत पाठविण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची योजना आहे. कदाचित केंद्रीय मंत्री नारायण राणेंना सुद्धा लोकसभेच तिकीट द्यायची मोदींची योजना असू शकते आणि जर नारायण राणे निवडणुकीच्या रिंगणात असतील तर ते नक्कीच विजयी होतील, कारण त्यांच्याबद्दल कोकणी जनतेच्या मनात आत्मियता आहे. याचा फायदा नारायण राणेंना होऊ शकतो. त्यामुळे ते उमेदवार असतील तर त्यांना शंभर टक्के पाठिंबा असेल असं मत व्यक्त करताना नारायण राणे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार असू शकतील अशा पद्धतीचे संकेत आज शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सावंतवाडीत बोलत असताना दिले.

Published on: Feb 01, 2024 06:25 PM
Budget 2024 : विरोधकांचा सुपडा साफ, घरी बसलेले घरीच बसणार; अर्थसंकल्पावरून शिंदेंचा खोचक टोला
Budget 2024 : मोदी सरकारच्या बजेटमध्ये काय-काय फायद्याचं? बघा स्पेशल रिपोर्ट