‘काँग्रेस उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री होऊ देणार नाही तर…’, सरकारमधील मंत्र्यानं केला मोठा दावा
'आजपर्यंत मातोश्री वरचा कुठलाही नेता सोनिया गांधी यांच्याकडे गेला नव्हता पण ठाकरेंनी ते केलं. जर का महाविकास आघाडीची पुन्हा सत्ता आली तर काँग्रेसचाच मुख्यमंत्री होईल ', शिंदे सरकारमधील मंत्र्यानं काय केला मोठा दावा?
उद्धव ठाकरे यांना बरोबर घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने उद्धव ठाकरे यांची फसवणूक केली आहे. पण जर का महाविकास आघाडीची पुन्हा सत्ता आली तर काँग्रेसचाच मुख्यमंत्री होईल, असं वक्तव्य शिवसेना नेते आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केले आहे. ते पुढे असेही म्हणाले की, काँग्रेस उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री होऊ देणार नाही असा दावा मंत्री दीपक केसरकर यांनी केला आहे. आजपर्यंत मातोश्री वरचा कुठलाही नेता सोनिया गांधी यांच्याकडे गेला नव्हता मात्र उद्धव ठाकरेंनी ते करून दाखवलं. बाळासाहेबांनी एक वेळ पक्ष नाही राहिला तरी चालेल पण काँग्रेसबरोबर जाणार नाही, अशा पद्धतीची भूमिका घेतली होती मात्र या सर्व भूमिकांना उद्धव ठाकरे यांनी छेद दिला आहे, असं वक्तव्य करत दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल करत आरोपही केला आहे.
Published on: Oct 07, 2024 05:35 PM