‘तुम्ही फक्त खोटे छत्रपती होऊ शकतात’, अमोल कोल्हेंच्या ‘त्या’ टीकेवर कोणाचा पलटवार?
नुकतीच शरद पवार गट राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा सावंतवाडीत आली होती. यावेळी शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसपक्षातील खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी मंत्री दीपक केसरकर यांच्यावर टीका केली. तर याटीकेला केसकरांकडूनही प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.
’15 वर्षे आमदार असलेल्या दीपक केसरकर यांना आता विश्रांती द्या. कामं होत नसतील तर दीपक केसरकरांना आराम द्या’, असं वक्तव्य करत अमोल कोल्हे यांनी दीपक केसरकर यांच्यावर निशाणा साधला होता. तर अमोल कोल्हे यांनी केलेल्या टीकेला दीपक केसरकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिल आहे. ‘माझ्या मतदारसंघात काय केलं पाहिजे हे अमोल कोल्हे पेक्षा मला चांगल माहिती आहे. तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सिनेमामध्ये काम करून तुम्ही फक्त खोटे छत्रपती होऊ शकता. जनतेचा छत्रपती असतो रयतेचा राजा छत्रपती असतो. तुम्हाला लोकांनी निवडून दिलंय त्यांची कामे करा. काय अधिकार आहे आम्हाला गद्दार म्हणण्याचा, तुम्हीतरी लोकांशी प्रामाणिक राहिलात का? तुम्ही जाहीर केलं होत मी सिनेसृष्टी सोडून देईन ते तुम्ही केलं का ? ती तुमची गद्दारी नाही का? असा सवाल दीपक केसरकर यांनी अमोल कोल्हेंना विचारला आहे.