अडीच वर्ष पर्यटनमंत्री पण कोकणात एकही प्रकल्प नाही, आदित्य ठाकरे यांच्यावर हल्लाबोल

| Updated on: May 23, 2023 | 3:34 PM

VIDEO | उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रासाठी काय काम केलं, 'या' मंत्र्यानं ठाकरे पिता-पुत्रांना घेरलं

मुंबई : आदित्य ठाकरे हे अडीच वर्ष पर्यटन मंत्री होते पण त्यांनी अडीच वर्षात कोकणात एकही प्रकल्प आणला नाही. तर उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रासाठी काय केलं असा सवाल करत मंत्री दीपक केसरकर यांनी ठाकरे पितापुत्रांवर जोरदार हल्लाबोल केलाय. सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा आहे. अडीच वर्ष आदित्य ठाकरे हे पर्यटन मंत्री होते पण या अडीच वर्षांत काय पर्यटनाचा विकास केला, कोकणात एकही प्रकल्प आणला नाही. त्यावेळी मी सांगत होतो. माझ्या खात्यातून निधी देण्यात आला होता. पण काही काम केले नाही, असे म्हणत दीपक केसरकर यांनी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. तर मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे होते. त्यांनी महाराष्ट्रासाठी काय केलं, असा सवाल केसरकर यांनी करत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय.

Published on: May 23, 2023 03:34 PM
Cabinet Expansion : मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेत सुसाट असणाऱ्या शहाजी पाटील यांचा सुचक इशारा; म्हणाले,”…मला”
‘बच्चा समझ के…’, फुटबॉल खेळताना उदयनराजे भोसले यांची डायलॉगबाजी, बघा व्हिडीओ