‘अजित दादा यांनी सरकारमध्ये यावं’, शिंदे सरकारमधील एका बड्या मंत्र्याची मोठी ऑफर

| Updated on: Jun 16, 2023 | 1:05 PM

VIDEO | राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांना सरकारमध्ये येण्यासाठी शिंदे सरकारमधील एका बड्या मंत्र्याची ऑफर, कुणी काय दिली नेमकी ऑफर?

नाशिक : राज्याच्या शिंदे-फडणवीस सरकारमधील एका बड्या मंत्र्यानं राज्याचे विरोधीपक्षनेते आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सरकारमध्ये येण्याची खुली ऑफर दिली आहे. हा बडा मंत्री म्हणजे दीपक केसरकर असून ते म्हणाले, अजित पवार यांच्याबद्दल मला अतिश आदर आहे. दादा विरोधी पक्षाचे नेते आहेत. ते जबाबदार नेते आहेत. त्यांनी बेजबाबदार विधाने करू नये. संजय राऊत सारखे लोक रोज बोलतात. त्यांच्या बोलण्याकडे कोणी लक्ष देत नाही. मात्र दादा जेव्हा बोलतात ते जनता त्याला गांभीर्यांने घेते. सामाजिक ऐक्य राखण्यामध्ये दादा आमच्या बरोबर आघाडीवर असतील याची मला खात्री आहे, असं सांगतानाच दादांनी पण सरकारमध्ये यावे ही आमची अपेक्षा आहे, असं राज्याचे मंत्री आणि शिंदे गटाचे नेते आणि मंत्री दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे.

Published on: Jun 16, 2023 12:46 PM
“अजित पवारांनी ‘ती’ यादी लवकरच जाहीर करावी”; मुंबई लोकलमधील अत्याचार प्रकरणावर संजय राऊत म्हणतात…
‘विजय शिवतारे तुम्ही कितीही हात-पाय आपटा, पवारांवर टीका करा; पण…’ कुणी दिला इशारा