Deepak Kesarkar : गौतमी पाटीलचं नाव घेतल्यावरून दीपक केसरकर यांचा निशाणा; म्हणाले, शरद पवार यांच्या तोंडात…
VIDEO | सरकारी शाळा खासगी कंपन्यांना चालवण्यासाठी देण्याच्या सरकारच्या निर्णयावर शरद पवार यांनी जोरदार हल्लाबोल केलाय. शरद पवार यांनी प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटील हिचं नाव घेतल्यावरूनही मंत्री दीपक केसरकर यांनी निशाणा साधला आहे. काय म्हणाले दीपक केसरकर बघा
मुंबई, १४ ऑक्टोबर २०२३ | नाशिक जिल्ह्यात गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलं होता. हा कार्यक्रम गावातील शाळेच्या मैदानात भरवल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर शिक्षण मंत्र्यांकडून या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहे. तर हा कार्यक्रम परवानगी घेऊन शाळेच्या नव्हे, तर ग्रामपंचायतीच्या खुल्या मैदानात घेतल्याचा दावा अयोजकांनी केला. अकोल्यात शरद पवार म्हणाले, ‘मद्य निर्मिती करणाऱ्या एका कंपनीने दत्तक घेतलेल्या शाळेत गौतमी पाटील हिच्या डान्सचा कार्यक्रम ठेवला. शाळेतील विद्यार्थ्यांसमोर आपण असे आदर्श ठेवणार आहोत का?’, असा सवालही शरद पवार यांनी केला. शरद पवार यांनी गौतमी पाटीलचं नाव घेतल्यावरूनही मंत्री दीपक केसरकर यांनी निशाणा साधला आहे. ग्रामपंचायत, पोलिसांच्या एनओसीनंतर शाळेसमोर गौतमीचा कार्यक्रम करण्यात आल्याचे म्हणत दीपक केसरकर यांनी स्पष्टीकरण दिलंय. शरद पवार यांच्या तोंडात असं नाव सुद्धा येता कामा नये. जिथे हा कार्यक्रम झाला तिथल्या मुख्याध्यापकला नोटीस देण्यात आली आहे. शाळेच्या परिसरात असभ्य वर्तन करणाऱ्यांना सस्पेंड करण्याच्या सूचना दिल्या आहेत. विनाकारण खोटी माहिती देण्याच काम केलं जातं असल्याचेही केसरकरांनी म्हटलंय.