खोटं बोलू नका, तुम्ही कोर्टात जा आणि…; दीपक केसरकर यांचं उद्धव ठाकरे यांना चॅलेंज काय?

| Updated on: Jan 16, 2024 | 5:12 PM

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निकालानंतर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची आज महापत्रकार परिषद होत आहे. या पत्रकार परिषदेच्या आधी शिवसेना नेते आणि मंत्री दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरे यांना चॅलेंज दिल्याचे पाहायला मिळाले.

मुंबई, १६ जानेवारी २०२४ : शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावरील निकालानंतर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची आज महापत्रकार परिषद होत आहे. या पत्रकार परिषदेच्या आधी शिवसेना नेते आणि मंत्री दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरे यांना चॅलेंज दिल्याचे पाहायला मिळाले. पक्षाची घटना ही पूर्णपणे लोकशाही विरोधात आहे असं सुप्रीम कोर्ट आणि निवडणूक आयोगानेही म्हटलं आहे. उद्या जर भाजपा अध्यक्षांनी मोदींना काढून टाकण्याचा निर्णय घेतला तर तो मान्य होईल का? तुम्ही आधी कबूल करा की तुम्ही १९९९ ची बाळासाहेब ठाकरे यांनी बनवलेली पक्षाची घटना बदलली हे जाहीरपणे सांगण्याची नैतिकता दाखवा, असं केसरकर यांनी म्हटलं आहे. तुम्ही आणि भाजप एकत्र येणार होते. काही कारणास्तव तुम्ही एकत्र आला नाहीत. शरद पवार यांनी तुम्हाला सांगितलं आहे, खोटं बोलू नका. तुम्ही कोर्टात जा. आमच्या विरुद्ध लढा, असं चॅलेंजही केसरकर यांनी उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे.

Published on: Jan 16, 2024 05:12 PM
संजय राऊत डायरेक्टर असणारा इव्हेंट महाराष्ट्राला पहायला मिळणार, ठाकरेंच्या पत्रकार परिषदेवर शिवसेना नेत्याची टीका
गिरीश महाजन श्रीमंत माणूस पण त्यांची किंमत एक रूपयाची, कुणाचा हल्लाबोल?