अडीच वर्षांपासून मंत्रिपदाच्या शपथविधीसाठी कोट शिवून तयार असलेल्या आमदारानं सांगितली निवडणुकीची तारीख

| Updated on: Sep 19, 2024 | 10:52 AM

मुंबईतल्या सॉफिटेल हॉटेलमध्ये महाविकास आघाडीच्या बैठकीत 2019 मध्ये जिंकलेल्या जागा त्या-त्या पक्षाकडेच राहणार आहेत. जिंकलेल्या जागा सोडून इतर जागांवर पक्षाची ताकद पाहून कोण उमेदवार असेल यावरही चर्चा झालीय. मेरिटनुसार जागा वाटप केलं जाणार असल्याचं महाविकास आघाडीकडून सांगण्यात आलंय.

Follow us on

विधानसभेच्या निवडणुका कधी घोषित होणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राच्या नजरा लागल्यात. मात्र मंत्री गिरीश महाजन आणि शिंदेंचे आमदार भरत गोगावले यांनी येत्या 15 दिवसांत घोषणा होईल असं म्हटलंय. त्यामुळं जागा वाटपावरुन हालचालीही सुरु झाल्याचे पाहायला मिळत आहे. अडीच वर्षांपासून मंत्रिपदाच्या शपथविधीसाठी कोट शिवून तयार असलेले शिंदेंचे आमदार भरत गोगावले यांनी निवडणुकीची तारीख सांगितली. 5 ऑक्टोबरपर्यंत आचारसंहिता आणि निवडणुकीची घोषणा होईल आणि 10 ते 12 नोव्हेंबरपर्यंत मतदान असेल, असं गोगावले म्हणालेत. गिरीश महाजनांनीही 10 ते 15 दिवसांत घोषणा होणार असल्याचं म्हटलंय. महाराष्ट्र विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबरला संपतेय. त्याआधी निवडणुका आणि निकाल येवून नव्या सरकारचा शपथविधी होणं आवश्यक आहे. त्यामुळं आता जागा वाटपावरुन मुंबईतल्या सॉफिटेल हॉटेलमध्ये महाविकास आघाडीची बैठक झाली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, संजय राऊत आणि अनिल देसाई उपस्थित होते. मुंबईतल्या 36 पैकी 30 जागांवर चर्चा झाली असून जवळपास जागा वाटप पूर्ण झालंय. 6-7 जागांवर लवकरच तोडगा काढण्यात येईल पुढचे 2 दिवस उर्वरित महाराष्ट्रातील जागांवर चर्चा होणार आहे.