मंत्री गिरिश महाजन यांनी नांदेड ते मुंबई एकाट्याने केला असा रेल्वे प्रवास
VIDEO | गिरीश महाजन स्वतःच्या बॅगा स्वतः उचलत केला नांदेड ते मुंबई रेल्वेने प्रवास
मुंबई : आमदार असो की खासदार किंवा एखादा मंत्री यांच्यासोबत पोलीस, पीए आणि सुरक्षा रक्षकांचा लावाजमा नेहमीच पाहायला मिळतो. मात्र याला मंत्री गिरीश महाजन अपवाद असल्याचे पाहायला मिळाले. मंत्री गिरीश महाजन यांनी कुणालाही न घेताच नांदेड ते मुंबई असा रेल्वेने एकट्यानी प्रवास केला. विशेष बाब म्हणजे गिरीश महाजन स्वतःच्या बॅगा स्वतः हातातून घेऊन जात होते. गिरीश महाजन यांना याबाबत विचारले असता मी आमदार असल्यापासूनच एकटा प्रवास करत असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची काल नांदेडला सभा होती. सभेला उशिर झाल्याने गिरीश महाजन यांना ट्रेनने मुंबईला यावं लागलं. गिरीश महाजन यांनी टीव्ही 9 मराठीशी संवाद साधला. ते म्हणाले, काल अमित शाह यांची नांदेडला सभा होती. त्यानंतर रात्री कुठलाच पर्याय मला नव्हता. मी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत रात्री नागपूरला जाऊन पुन्हा 10.30 वाजता मुंबईला येणार होतो. कार्यक्रमाला उशीर झाल्याने ते शक्य नव्हतं. त्यामुळे नांदेडला मी ट्रेन गाठून मुंबईला आलो. ठाण्याला माझी सकाळी सभा होती. त्यामुळे मी ट्रेनला बसलो. माझ्यासोबत पीए नाही, बॉडीगार्डही नाही, असं गिरीश महाजन यांनी सांगितलं.