Gulabrao Patil यांच्यावर कार्यकर्त्याची आक्षेपार्ह शब्दात टीका अन् कार्यकर्त्याला शिवीगाळ, ऑडिओ क्लिप व्हायरल

| Updated on: Sep 06, 2023 | 10:39 AM

VIDEO | राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर कार्यकर्त्याची आक्षेपार्ह शब्दात टीका, टीकेवर भडकताच गुलाबराव पाटील यांची कार्यकर्त्याला आईवरून शिवीगाळ, कथित ऑडिओ क्लिप होतेय व्हायरल

जळगाव, ६ सप्टेंबर २०२३ | मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून वाद घालताना कार्यकर्त्याने राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांना जुलाबराव म्हटलं आणि टीका केली. कार्यकर्त्याने केलेल्या या टीकेनंतर गुलाबराव पाटील चांगलेच भडकले. या टीकेवर कार्यकर्त्याला झापताना गुलाबराव पाटील यांनी थेट कार्यकर्त्याला आईवरून शिवीगाळ केल्याचं समोर आलं आहे आणि हीच गुलाबराव पाटील यांची ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होत असल्याने जळगावात एकच खळबळ उडाली आहे. मात्र, टीव्ही 9 मराठी या कथित ऑडिओ क्लिपला कोणताही दुजोरा देत नाही. या ऑडिओ क्लिपमध्ये कार्यकर्त्याकडून गुलाबराव पाटील यांना मराठा आरक्षणासंदर्भात आक्रमक भूमिका मांडण्याची मागणी करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्याने गुलाबरावांचा उल्लेख गुलाबराव ऐवजी जुलाबराव असा केल्याचे सांगितले जात आहे.

Published on: Sep 06, 2023 10:39 AM
मोदी सरकारविरोधात शेतकरी आक्रमक, ‘या’ दिवशी सर्व राज्यात आंदोलनाची हाक
Manoj Jarange Patil यांचं नवव्या दिवशीही उपोषण सुरूच, प्रकृती खालावली अन्