Gulabrao Patil : …तर नक्कीच दाल में कूछ काला है, एकनाथ खडसे यांच्यावरील कारवाईवर गुलाबराव पाटील काय म्हणाले?
VIDEO | शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांच्यावर अवैध्यरित्या गौण खनिजाचे उत्खनन केल्याप्रकरणी १३७ कोटी १४ लाखांचा दंड, मुक्ताईनगर तहसीलदारांनी खडसे यांना बजावली नोटीस, या कारवाईवर गुलाबराव पाटील यांनी काय केलं भाष्य?
जळगाव, 20 ऑक्टोबर 2023 | शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांच्या कुटुंबीयांच्या अडचणी वाढल्या असून अवैध्यरित्या गौण खनिजाचे उत्खनन केल्याप्रकरणी खडसेंना १३७ कोटी १४ लाखांचा दंड आकारला आहे. मुक्ताईनगर तहसीलदारांनी नोटीस बजावली आहे. यावर पाणीपुरवठा मंत्री आणि शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी भाष्य केले आहे. तर ही कारवाई राजकीय द्वेशातून होत असल्याचे एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे. यावर गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. शासनाच्याच प्रतिनिधींना दंडाची नोटीस बजावली असेल तर नक्कीच दाल में कूछ काला आहे. प्रशासनानेच कारवाईचे आदेश केल्यामुळेच ती कारवाई होईल. तर तहसीलदार कोणत्या पक्षाचा आहे का? ज्या ठिकाणाहून गौण खनिजाची चोरी झाली त्याचे मोजमाप, हे निष्पन्न झाल्यानंतरच काय ही कारवाई झाली असेल, त्यामुळे या कारवाईला राजकीय रंग देऊ नये अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.