हा क्षमा करणारा महाराष्ट्र आहे, असे गुलाबराव पाटील का म्हणाले?

| Updated on: Feb 12, 2023 | 1:08 PM

VIDEO | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या राजीनाम्यावर मंत्री गुलाबराब पाटील यांची प्रतिक्रिया, बघा व्हिडीओ

जळगाव : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविरोधात अवमानकारक उद्गार काढणं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना चांगलंच भोवलं आहे. या विधानावरून राज्यपाल यांच्यावर चौफेर टीका झाल्यानंतर कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर झाला आहे. यावर पाणीपुरवठा मंत्री गुलाबराब पाटील यांनी भाष्य केले आहे.राज्यपालपदावरून राजीनामा देण्याची मानसिकता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची होती. राज्यपालांचा कार्यकाळ संपलेला होता. जनतेचा रोष घेण्यापेक्षा राजीनामा दिला आणि त्यांच्याकडून जी चांगली कामं झाली त्याबद्दल त्यांचे मंत्री गुलाबराब पाटील यांनी आभार व्यक्त केले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविरोधात अवमानकारक उद्गार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना काढले गेले होते, शेवटी हा क्षमा करणारा महाराष्ट्र आहे. येत्या पुढील काळात कोणीही महापुरूषांबद्दल आक्षेपार्ह विधानं करू नये अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.

Published on: Feb 12, 2023 01:08 PM
भगतसिंग कोश्यारी राज्यपाल नव्हे तर भाजपचे प्रवक्ते असल्यासारखंच वागायचे; कुणाचा निशाणा? पाहा…
हा तर कोश्यारींचा सन्मान, त्यांची हकालपट्टी करायला पाहिजे होती; नाना पटोले आक्रमक