संजय राऊत सारखं भूत उद्धव ठाकरे यांनी आवरावं, कुणी दिला निकालानंतर खोचक सल्ला?
शिवसेना पक्ष वाचवण्यासाठीच आम्ही बाहेर पडलो आणि निर्णय घेतला त्याला अनेक लोकांनी गद्दारी म्हटलं. मात्र शेवटी बहुसंख्येला महत्त्व आहे आणि त्यामुळे हा निकाल शिवसेनेच्या बाजूने लागला आहे. आमदार अपात्रता प्रकरणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांच्या बाजूने निकाल लागला आहे. या निकालानंतर मंत्री गुलाबराव पाटील यांनी पहिली प्रतिक्रिया दिली.
जळगाव, १२ जानेवारी २०२४ : संजय राऊत यांनी राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालावर भाष्य करत फिक्सिंग असल्याची टीका केली होती. यानंतर मंत्री गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरे यांना सल्ला देत संजय राऊत यांच्यावर खोचक टीका केली. शिवसेना पक्ष वाचवण्यासाठीच आम्ही बाहेर पडलो आणि निर्णय घेतला त्याला अनेक लोकांनी गद्दारी म्हटलं. मात्र शेवटी बहुसंख्येला महत्त्व आहे आणि त्यामुळे हा निकाल शिवसेनेच्या बाजूने लागला आहे. आमदार अपात्रता प्रकरणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांच्या बाजूने निकाल लागला आहे. या निकालानंतर मंत्री गुलाबराव पाटील यांनी पहिली प्रतिक्रिया देत त्यांच्यावर टीका करणाऱ्यांना जोरदार उत्तर दिलं आहे. ज्यांना घटनाच माहीत नाही. घटनेमध्ये काय चुका राहिल्या. ते माणसं कशा पद्धतीने पक्ष चालवत असतील हे आपल्या लक्षात आले. कुठला अन्याय झाला आहे, उलट पक्ष वाचविण्याकरिता आम्ही 40 लोकांनी त्यांना सावध करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी त्याला महत्व दिलं नाही. या गोष्टींचा विचार उद्धव ठाकरे यांनी करायला हवा होता मात्र त्यांनी केला नाही, असेही गुलाबराव पाटील म्हणाले.