RBI 2000 Rupee Note | दोन हाजाराच्या नोटबंदीवर गुलाबराव पाटील यांचं मिश्कील भाष्य, म्हणाले…
VIDEO | दोन हजाराच्या नोटबंदीवर गुलाबराव पाटील यांचं गमतीशीर उत्तर, असं काय म्हणाले की, सगळेच हसायला लागले?
जळगाव : रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या निर्देशांनुसार, देशातील सर्वसामान्यांना 23 मे ते 20 सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत आपल्याकडे असलेल्या 2 हजाराच्या नोटा बँकेत जमा किंवा बदलून घ्यावं लागणार आहे. अर्थात तो पर्यंत दोन हजाराच्या नोटा या चलनात असतील आणि व्यवहारही होऊ शकतील, असं आरबीआयकडून नागरिकांना सांगण्यात आले आहे. या निर्णयानंतर राजकीय वर्तुळातूनही प्रतिक्रिया येताना दिसताय. अशातच शिवसेनेचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी दोन हजाराच्या नोटबंदीवर गमतीशीर उत्तर दिल्याचं पाहायला मिळालं. पाचशेच्या नोट नंतर आता चलनातील 2000 ची नोट सुद्धा बंद होणार असून त्याची नोटीस नुकतीच जारी करण्यात आली आहे. केंद्र शासनाच्या या निर्णयाने संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे, असे गुलाबराव पाटील यांना विचारताच ते म्हणाले, माझ्याकडे दोन हजार रुपयांची नोट नाही त्यामुळे मला माहित नाहीये, असं गमतीशीर उत्तर मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिलंय. त्यांच्या गंमतीशीर उत्तरानंतर या ठिकाणी एकच हशा पिकला. त्यांच्या उत्तराने यावेळी काही जण अवाक् झाल्याचे पाहायला मिळाले.