रविकांत तुपकर यांचं नौटंकी आंदोलन, कुणी केली खोचक टीका?

| Updated on: Feb 12, 2023 | 2:04 PM

VIDEO | आंदोलन करायला बरेच मार्ग पण..., रविकांत तुपकर यांच्या आत्मदहन आंदोलनावर काय म्हणाले गुलाबराव पाटील?

जळगाव : शेतकऱ्यांच्या सोयाबीन आणि कापसाच्या पिकाला बाजार पेठेत योग्य भाव नसल्याने शेतकऱ्यांच्या अपक्षेचा भंग झाला आहे. तरी सुद्धा हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी उभं राहिल. येणाऱ्या मंत्रिमंडळात शेतकऱ्यांच्या कापसाच्या बाबतीत योग्य निर्णय घ्यावा, अशी स्वत: मागणी करणार असल्याचे आश्वासन पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले आहे. तर शेतकऱ्यावर लाठीचार्ज करणं योग्य की अयोग्य याबाबत ते म्हणाले, लाठीचार्ज करणं चुकीचे आहे पण अतिरेक करणं हेही चुकीचे आहे. आंदोलन करायला बरेच मार्ग आहेत मीपण बरेच आंदोलन केलीत पण नोटंकी आंदोलन पसंत नाही, असे म्हणत गुलाबराव पाटील यांनी रविकांत तुपकर यांच्यावर खोचक टीका केली आहे.

Published on: Feb 12, 2023 01:26 PM
हा क्षमा करणारा महाराष्ट्र आहे, असे गुलाबराव पाटील का म्हणाले?
अपघातानंतर पहिल्यांदाच धनंजय मुंडे बीडमध्ये; क्रेनने हार घालत स्वागत