चारही खांदे गेले तर मी काय करू, गिरीशभाऊ आले घेऊन गेले, राम बोलो भाई राम; गुलाबराव पाटलांची तुफान बॅटिंग
लोक म्हणतात आम्ही फुटलो... पण आम्ही फुटलो नाही त्यांच्यासमोर गेलो.. संजय राजाराम राऊतच्या समोर गेलो. हा खानदेशातला पोट्टटा गेला. मला घ्यालला गिरीश महाजन आले. मंगेश चव्हाण तर सफाई कर्मचाऱ्याचा ड्रेस घालून आले होते आणि मी अँब्युलन्स मध्ये गेलो. तर....
आमदार गुजरातकडे निघाले तेव्हा परत बोलवायला संजय राऊत यांना सांगितलं होतं. पण त्यांनी हिणवलं म्हणून आम्ही २० आमदार गुजरातला गेलो, असे वक्तव्य करत शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केलेत. लोक म्हणतात आम्ही फुटलो… पण आम्ही फुटलो नाही त्यांच्यासमोर गेलो.. संजय राजाराम राऊतच्या समोर गेलो. हा खानदेशातला पोट्टटा गेला. मला घ्यालला गिरीश महाजन आले. मंगेश चव्हाण तर सफाई कर्मचाऱ्याचा ड्रेस घालून आले होते आणि मी अँब्युलन्स मध्ये गेलो. तर सगळे मला गद्दार म्हणतात, मात्र मी वेट अॅंड वॉच केलं, ३३ नंबरला गेलो…आपण चुकलोय आपण चूक दुरूस्त करू शकतो. आपण पुन्हा आपल्या वळणावर येऊ शकतो. म्हणून मी पहिल्या रांगेत नाही गेलो ३३ नंबरला गेलो. चारही खांदे गेले तर मी आग्या काय करू, गिरीश भाऊ आले आणि घेऊन गेले… राम बोलो भाई राम…, असे म्हणत जळगावातील महायुतीच्या मेळाव्यात मंत्री गुलाबराव पाटील यांनी जोरदार बॅटिंग केली.