आमचेचं दोन तुकडे झालेत, आधे इधर आधे उधर अशी सध्या स्थिती, गुलाबराव पाटील नेमकं काय म्हणाले?

| Updated on: Nov 27, 2023 | 4:12 PM

आम्ही शिंदे गटाचे पहिलेच आमचे दोन तुकडे झाले आहेत. त्यामुळे आम्ही आधे इधर आधे उधर अशी स्थिती आहे. मात्र युतीत आम्ही असल्याने युतीतही आमची चंचू ताकद असून त्याप्रमाणे आम्ही मदत करण्याचे वचन देत असल्याचे म्हणत गुलाबराव पाटील यांनी भाष्य केले आहे.

Follow us on

जळगाव, २७ नोव्हेंबर २०२३ : आमचेच दोन तुकडे झालेत, आधे इधर आधे उधर अशी सध्या आमची स्थिती आहे, असे वक्तव्य मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे. जळगाव येथे परीट समाजाच्या एका कार्यक्रमात बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले, केंद्रात मदत लागत असेल तर भाजपा आहे. आम्ही शिंदे गटाचे पहिलेच आमचे दोन तुकडे झाले आहेत. त्यामुळे आम्ही आधे इधर आधे उधर अशी स्थिती आहे. मात्र युतीत आम्ही असल्याने युतीतही आमची चंचू ताकद असून त्याप्रमाणे आम्ही मदत करण्याचे वचन देत असल्याचे म्हणत गुलाबराव पाटील यांनी भाष्य केले आहे. दरम्यान परीट समाजाच्या आरक्षणाबाबत जी शिफारस करायची आहे, ती राज्य सरकारने केली आहे. त्यामुळे मेहरबानी करून राज्याला त्रास देऊ नका, असा मश्किल टोलाही मंत्री गुलाबराव पाटील यांनी लगावला आहे.