कोल्हापूरच्या राजकारणातील नव्या ‘जय-विरु’ची बाईक राईड, राजकीय वर्तुळात चर्चा

| Updated on: Dec 25, 2023 | 2:49 PM

भाजपचे खासदार धनंजय महाडिक हे मंत्री हसन मुश्रीफ यांचे सारथी बनले. पोलीस दलाला हस्तांतरित केलेल्या वाहनांचा सोहळा आज धनंजय महाडिक आणि हसन मुश्रीफ यांच्या हस्ते पार पडला. यावेळी धनंजय महाडिक यांच्या बुलेट गाडीवर हसन मुश्रीफ बसल्याचे पाहायला मिळाले.

कोल्हापूर, २५ डिसेंबर २०२३ : कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात नवीन गट्टी जमली आहे. भाजपचे खासदार धनंजय महाडिक हे मंत्री हसन मुश्रीफ यांचे सारथी बनले आहे. पोलीस दलाला हस्तांतरित केलेल्या वाहनांचा सोहळा आज धनंजय महाडिक आणि हसन मुश्रीफ यांच्या हस्ते पार पडला. यावेळी धनंजय महाडिक यांच्या बुलेट गाडीवर हसन मुश्रीफ बसल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे धनंजय महाडिक आणि हसन मुश्रीफ या जोडगोळीची सध्या राजकीय वर्तुळातही जोरदार चर्चा सुरू झाली. कालच हसन मुश्रीफ यांनी महायुतीच्या पक्षांची समन्वय बैठक घेतली होती. त्याच्या दुसऱ्या दिवशी हे चित्र पाहायला मिळालं. त्यामुळे कोल्हापूरच्या राजकारणामध्ये नवी समीकरणे तयार होत आहेत का? असा प्रश्न अनेकांना पडला. तर कोल्हापूरच्या राजकारणातील नवे ‘जय-विरु’ असेही या जोडगोळीला उल्लेखलं जात आहे.

Published on: Dec 25, 2023 02:49 PM
एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून भाजपनं मुंबई लुटली? ठाकरे गटाच्या नेत्याचा घणाघात
संजय राऊत चायनीज मॉडेल, त्यांना फक्त निवडणुकीत राम आठवतो; नितेश राणे यांच्याकडून खरपूस समाचार