Jayant Patil | गृहमंत्री झाल्यावर शुगर-बीपीचा त्रास सुरु होतो, जयंत पाटील यांचं मिश्कील भाष्य
गृहमंत्री झाल्यावर ब्लडप्रेशर आणि शुगरचा त्रास सुरु होतो, हे मला अगोदरच आर आर आबांनी सांगितलं होतं आणि झालंही तसंच गृहमंत्री झाल्यानंतर आपल्याला ब्लड प्रेशरचा त्रास सुरु झाला, असं जयंत पाटील यांनी सांगितलं.
गृहमंत्री झाल्यावर ब्लडप्रेशर आणि शुगरचा त्रास सुरु होतो, हे मला अगोदरच आर आर आबांनी सांगितलं होतं आणि झालंही तसंच गृहमंत्री झाल्यानंतर आपल्याला ब्लड प्रेशरचा त्रास सुरु झाला, असं जयंत पाटील यांनी सांगितलं. सांगलीतील पोलिस मुख्यालयातील नूतन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी केलेल्या भाषणात सध्याच्या राजकीय संदर्भाने त्यांनी तुफान फटकेबाजी केली.