Narayan Rane : अरे चल रे…कसले मराठे XXXX, नारायण राणे यांच्याकडून मराठा कार्यकर्त्याला शिवीगाळ?

| Updated on: Oct 29, 2023 | 4:03 PM

VIDIEO | मंत्री नारायण राणे यांच्या आवाजातील एक कथिक ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये नारायण राणे यांनी एका मराठा कार्यकर्त्याला शिवीगाळ केल्याचा आरोप केला जात आहे. पण या कथित ऑडिओ क्लिपची टीव्ही 9 मराठी पृष्टी करत नाही.

मुंबई, २८ ऑक्टोबर २०२३ | भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा एक कथित फोन कॉल सध्या सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे. यामध्ये मराठा कार्यकर्ता नारायण राणे यांना फोन करतो. सुरूवातीला हा फोन नारायण राणे यांच्याशी संबधित असलेला व्यक्ती उचलतो. नंतर हा व्यक्ती नारायण राणे यांना फोन देतो. यावेळी मराठा कार्यकर्ता आणि नारायण राणे यांच्यात थोडा संवाद झाल्यानंतर नारायण राणे संबंधित मराठा कार्यकर्त्याला शिवीगाळ करत असल्याचे ऐकायला मिळते. फोन करणारा मराठा कार्यकर्ता आपली ओळख रविंद्र मुटे अशी सांगतो आणि आपण छत्रपती संभाजीनगर मधून फोन केल्याचे सांगत असताना वारंवार जय शिवराय असा उल्लेख करतो. दरम्यान, राणे आणि मराठा कार्यकर्त्याच्या संवादाची एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. त्यात ही शिवीगाळ आहे. पण या कथित ऑडिओ क्लिपची टीव्ही 9 मराठी पृष्टी करत नाही.

Published on: Oct 29, 2023 04:03 PM
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी उच्चशिक्षित तरूणांनी स्वतःला जमिनीत अर्धे गाडले अन्…
Manoj Jarange Patil : थोडं थांबा…सरकारला थोड्या दिवसात कळेल, जरांगे पाटलांचा सूचक इशारा काय?