नाहीतर राम राम म्‍हणण्‍याची वेळ येईल, नारायण राणेंनी कुणाला दिला इशारा?

| Updated on: Mar 08, 2024 | 6:08 PM

रामदास कदम यांनी भाजपवर आगपाखड केल्यानंतर नारायण राणे यांनी ट्वीटद्वारे रामदास कदम यांचं नाव न घेता खडेबोल सुनावले आहे. नाहीतर आपल्‍याच फडफडीने फांदी तुटून राम राम म्‍हणण्‍याची वेळ येईल...असे म्हणत नारायण राणे यांनी अप्रत्यक्षपणे रामदास कदम यांना सुनावले आहे.

मुंबई, ८ मार्च २०२४ : ‘फांदीवर बसलेल्‍यांनी आव्‍हानाची भाषा करु नये, नाही तर आपल्‍याच फडफडीने फांदी तुटून राम राम म्‍हणण्‍याची वेळ येईल’, असे म्हणत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेचे नेते रामदास कदम यांना सूचक इशारा दिला आहे. रामदास कदम यांनी भाजपवर आगपाखड केल्यानंतर नारायण राणे यांनी ट्वीटद्वारे रामदास कदम यांचं नाव न घेता खडेबोल सुनावले आहे. नारायण राणे म्हणाले, आमचे मित्रपक्ष व सहकारी यांच्या गळ्यात हार पडावे , त्यांचा सन्मान व्हावा यासाठी भारतीय जनता पक्ष नेहमी कार्यरत असतो. आम्ही केसाने गळा कापत नाही. केसाने गळा कापणारे आता रानोमाळ फिरत आहेत. आपणच आपले नाव घेऊन काय उपयोग? जनमानसात आपले नाव असले पाहिजे, असे त्यांनी म्हटले तर फांदीवर बसलेल्‍यांनी आव्‍हानाची भाषा करु नये, नाही तर आपल्‍याच फडफडीने फांदी तुटून राम राम म्‍हणण्‍याची वेळ येईल, असा इशाराही नारायण राणे यांनी दिला.

Published on: Mar 08, 2024 06:07 PM
‘शिंदेंनी उठाव केला नसता तर…’, संजय शिरसाट यांचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
उद्धव ठाकरे यांनी घेतलेली ‘ती’ शपथ खरी, संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले?