Special Report | मंत्री नवाब मलिकांचे ‘फर्जीवाडा’वरुन पुन्हा गंभीर आरोप
राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच पुन्हा एकदा एनसीबी अधिकाऱ्यांवर (NCB Officers) गंभीर आरोप केलाय.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच पुन्हा एकदा एनसीबी अधिकाऱ्यांवर (NCB Officers) गंभीर आरोप केलाय. मॅडी नावाच्या पंच साक्षीदाराला जुन्या केसमध्ये मागील तारखेवर जबाब नोंदविण्यासाठी एनसीबीच्या किरणबाबू नावाच्या अधिकाऱ्याकडून कार्यालय सोडून अन्यत्र बोलावण्यात आल्याची संभाषणाची ऑडिओ क्लिप (Audio Clip) मलिक यांनी जाहीर केलीय. याद्वारे मलिकांनी एनसीबीच्या कार्यपद्धतीबाबत पुन्हा एक गंभीर आरोप पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केलाय. दरम्यान एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे त्या साक्षीदाराला स्वाक्षरी करण्याची सूचना देत असल्याचेही संभाषण या ऑडिओ क्लीपमध्ये असल्याने एनसीबी कशापद्धतीने फर्जीवाडा करत आहे, असं नवाब मलिक यांनी स्पष्ट केले आहे.
Published on: Jan 02, 2022 08:50 PM