नितीन गडकरी यांच्याकडून आमदार, खासदारांना कानपिचक्या; म्हणाले, ‘रस्त्यांसाठी पैसे देणार पण विनंती आहे की…’
tv9 Special Report | वाशिम जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तुफान फटकेबाजी केल्याचे पाहायला मिळाले. यावेळी नितीन गडकरी यांच्याकडून आमदार आणि खासदारांना कानपिचक्या दिल्याचेही पाहायला मिळाले. 'निधी कमी पडू देणार नाही पण त्यांनी ठेकेदारांना त्रास देऊ नका'
मुंबई, ३० सप्टेंबर २०२३ | केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते वाशिममध्ये महामार्गाचे लोकार्पण झाले. यावेळी नितीन गडकरी यांनी आमदार, खासदारांना चांगल्याच कानपिचक्या दिल्यात. रस्त्यासाठी आमदार आणि खासदार यांना निधी कमी पडू देणार नाही पण त्यांनी ठेकेदारांना त्रास देऊ नये, असे म्हणत जाहीर कार्यक्रमात नितीन गडकरी यांनी आमदार, खासदारांना विनंती केली. “मी भxxगिरी केली नाही. मी आतापर्यंत 50 लाख कोटी रुपयांपर्यंतची कामे दिली आहेत. पण एकही कॉन्ट्रॅक्टरला कॉन्ट्रॅक्ट मिळविण्याकरता माझ्या घरी येण्याची गरज पडली नाही. मी कॉन्ट्रॅक्टरला सांगितलं आहे. रस्त्याला तडा गेला रस्ता खराब झाला तर कॉन्ट्रॅक्टरला बुलडोझर खाली टाकीन”, असे नितीन गडकरी यांनी वाशिममध्ये म्हणत जोरदार फटकेबाजी केली. दरम्यान, गडकरी यांनी साधलेल्या टायमिंगची सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा होताना दिसतेय.