एक्सप्रेस वेवर प्रतिकिमीसाठी 250 कोटी खर्चाचा आरोप, नितीन गडकरी यांनी सोडलं मौन अन् कॅगचे आकडे फेटाळले

| Updated on: Aug 19, 2023 | 10:26 PM

VIDEO | कॅगच्या रिपोर्ट्मधून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर आरोप, नितीन गडकरी यांनी एक्सप्रेस वे बांधताना प्रति किलोमीटरसाठी किती खर्च आला, थेट हिशोबच सांगितला...बघा स्पेशल रिपोर्ट

मुंबई, १९ ऑगस्ट २०२३ | कॅगच्या रिपोर्टमध्ये नितीन गडकरी यांच्या खात्यावर ताशेरे ओढण्यात आलेत. मात्र मुद्दाम मराठी माणसाच्या विरोधात षडयंत्र रचलं जात असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. मात्र ज्या आकडेवारीवरून कॅगनं बोटं ठेवलं आहे. त्या आरोपांवर नितीन गडकरी यांनी स्पष्टीकरण देत कॅगचा दावा खोडून काढलाय. कॅगचा एक रिपोर्ट आला आणि संपूर्ण देशाचं लक्ष केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केंद्रीत झाले. मात्र मराठी माणसाला मुद्दाम दिल्लीत अडचणीत आणण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. द्वारका ऐक्सप्रेसचा खर्च १८ कोटी प्रति किमी ऐवजी २५० कोटी प्रति किमी करण्यात आल्याचा ठपका कॅगमधून ठेवण्यात आलाय. त्यामुळे यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप काँग्रेसने केलाय. मात्र हे सर्व आरोप नितीन गडकरी यांनी फेटाळले आहेत. 29.06 किलोमीटरच्या एक्सप्रेस वे वरील प्रत्येक किलोमीटरसाठी अवाच्या सव्वा 250.77 कोटी रुपचे खर्च झाल्याच कॅगच्या अहवालात म्हटलं आहे. आर्थिक विषयावरील कॅबिनेट कमिटीने प्रति किलोमीटरसाठी 18.2 कोटी रुपये मंजूर केले होते. ही मर्यादा ओलांडण्यात आली, असं कॅगच्या रिपोर्ट्मध्ये म्हटलं आहे. यावर नितीन गडकरी काय म्हणाले बघा स्पेशल रिपोर्ट…

Published on: Aug 19, 2023 10:15 PM
‘ईट का जवाब पत्थर से’, भाजपचं मिशन लोकसभा सुरू, घरोघरी करणार प्रचार
सत्तेचा अमरपट्टा घेऊन आले नाही, राज ठाकरे यांनी भाजपला नेमका काय दिला इशारा?