अडीच वर्षे फक्त फेसबुकवरचे मुख्यमंत्री, नाव न घेता कुणी लगावला उद्धव ठाकरे यांना टोला
VIDEO | अडीच वर्षात पायउतार व्हावे लागल्यानंतर मविआ आणि शिवसेना-भाजपमध्ये वाद रंगला, अशातच उद्धव ठाकरे यांच्यावर कुणी केली सडकून टीका?
सोलापूर : महाराष्ट्रात सत्तासंघर्ष झाल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आले. यापूर्वी महाविकास आघाडीला अडीच वर्षात अपयश आल्यानंतर पायउतार व्हावे लागले. दरम्यान महाविकास आघाडी आणि शिवसेना-भाजप असा वाद आता चांगलाच रंगला आहे. त्यातच आज महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आज सोलापूर मधील करमाळा दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळावर सडकून टीका केली. उद्धव ठाकरे हे फेसुबकवरचे मुख्यमंत्री असल्याची खोचक टीका त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. तर दुसरीकडे त्यांनी शरद पवार यांचे नाव न घेता पुण्याच्या पुढाऱ्यांनी फक्त मृगजळ दाखवण्याची सवय लावली असा टोला त्यांनी शरद पवार यांना लगावला आहे. करमाळा तालुक्याचे पाणी कधी पुण्याला गेले हे तुम्हाला समजलेही नाही, आपण फक्त झेंडे खांद्यावर घेऊन आयुष्यभर फिरत राहिला अशी बोचरी टीका त्यांनी त्यांच्यावर केली आहे.