अजित पवार हे भाजपच्या वाटेवर? ‘या’ मंत्र्यानं सांगितलं, ‘त्यांच्या मनात…’
VIDEO | अजित पवार भाजप बरोबर जाणार, तेही लवकरच... असे अंजली दमानिया यांच्या ट्विटने खळबळ, या मंत्र्यानं अजित पवार यांच्याबद्दल म्हटलं...
सातारा : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या एका ट्विटने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. राज्याच्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येणं अद्याप बाकी असताना ’15 आमदार बाद होणार आहेत, आणि अजित पवार भाजप बरोबर जाणार आहेत…. तेही लवकरच…’, असे अंजली दमानिया यांच्या ट्विटने चर्चांना उधाण आल्याचे पाहायला मिळाले आहे. अशातच उत्पादक शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांना विचारण्यात आले असताना त्यांनी यावर भाष्य करणं टाळलं ते म्हणाले, अजित पवार हे भाजपच्या वाटेवर हा विषय तुम्ही अजित पवार यांना विचारा आम्हाला याची काहीही कल्पना नाही. अजित पवार यांच्या मनात काय असते ते स्पष्ट बोलतात आणि त्या पद्धतीने वागतात. ज्यांनी याबद्दल ट्विट केले त्यांनाच विचारा किंवा ज्यांच्याबद्दल केलं आहे त्यांना विचारा परंतु मी या विषयावर बोलू शकत नाही, असे म्हणत उत्पादक शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनी स्पष्टपणे म्हटले आहे.